वाहन चोराकडुन दोन दुचाकी गाड्या जप्त..!

दिनांक २४/०४/२०२५ रोजी स्पाईस गार्डन हॉटेल लेकटाऊन, पुणे येथे फिर्यादी यांनी त्यांची अॅक्टीव्हा दुचाकी गाडी ही लॉक करुन पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी केली आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २२२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३-२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे वर नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा आरोपी नामे किरण लक्ष्मण जांभळे, वय ३६ वर्षे, रा. अपर ओटा, ए ३५ रुम नंबर ४, महाडीक मैदानाजवळ, अपर इंदीरानगर, पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेली अॅक्टीव्हा दुचाकी गाडी ही जप्त करण्यात आली आहे.

Advertisement

आरोपीकडे केले तपासामध्ये भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २०६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३-२ अन्वये गुन्हा उघडकीस आला असुन त्याचेकडुन नमुद गुन्हयातील यमाहा कंपनीची आर.एक्स.१०० तिचा नंबर MJJ6689 ही जप्त केली आहे. आरोपीकडुन भारती विद्यापीठ पो. स्टे कडील दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल कुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे,

किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page