पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, कसा असेल दौरा? वाचा एका क्लिकवर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते अनेक विकास कामांच उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गीका आणि भिडेवाड्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जय्यत तयारी करण्यात येत आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या संध्याकाळी 5.35 च्या दरम्यान पुणे विमानतळावर दाखल होतील. त्यानतंर ते साधारण 5.55 च्या सुमारास पुणे विमानतळावरुन मोदी शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनला पोहोचतील. यानंतर ते शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथून शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच मेट्रोने प्रवास करत मोदी स्वारगेटला पोहोचतील. यानंतर स्वारगेट येथून स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येईल. तसेच स्वारगेटवरुन 6.30 वाजता मोदी एसपी कॉलेज येथे सभास्थळी पोहचतील. यानंतर रात्री 7.55 मिनिटांनी मोदी पुणे विमानतळाहून दिल्लीला रवाना होतील.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page