राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी कडून फरार घोषित पण,… गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी केले जेर बंद….
शास्त्रीनगर बीट मार्शल वरील पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नजन हे शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्रग्रस्त घालत असताना, रात्री अडीच वाजता संशयित चोरांना ताब्यात घेऊन रात्रपाळीच्या अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी यांना कळवले .त्यानंतर त्यांनी पोलीस अंमलदार बाला रफी शेख ,अनिकेत जमदाडे ,ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल, यांची टीम तयार करून संशयित इसमांची घर झडती केली असता एक जिवंत काढतुस ,4 मोबाईल ,एक लॅपटॉप व इतर कागदपत्रे मिळून आली त्यामध्ये संशयित हे देश विघातक कृत्या सहभागी असल्याचा संशय आल्याने अधिक तपास करता ते राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एन आय ए )फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्यांचे विरुद्ध कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा 175, 2023 भा.दं .वि.सं. कलम 4 6 8, 37 9,511,34 भारतीय हत्यार कायदा कलम3(25),4(25), महाराष्ट्र पोलीस ऍक्ट क्रमांक अन्वये गुन्हा दाखल केला आहे .
पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार मा.सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक ,मा. पोलीस उप आयुक्त मंत्रिमंडळ 03. पुणे श्री . सोहेल शर्मा यांनी वरील कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर येथे बोलावून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आहे. तसेच यापुढे देखील त्यांनी अशीच उत्तम कामगिरी करावी यासाठी मार्गदर्शन केले .
जन हक्क टाइम्स पुणे
अकबर शिकलकर




