खडकी भागात १०,६०,०००/- रु किं. चा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ केला जप्त..!

दि.१६/०४/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे खडकी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार युवराज कांबळे यांना मिळालेल्या बातमी वरून एक इसम नामे बजरंगलाल भगवानराम खिल्लेरी, वय २१ वर्षे, रा. जाधववाडी, सीएनजी पंपा जवळ, मोशी, पुणे मुळ गाव राजस्थान हा संशयास्पदरित्या मिळुन आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये १०,६०,०००/-रू. कि.चे ५३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १,८०,०००/- रू.कि.ची महागडी गाडी स्पोर्टस बाईक यामाहा R15 गाडी नं. एम एच १४ एल डी ९८६६ असा अंमली पदार्थ व इतर पैवज असा एकुण १२,९०,०००/- रु.कि.चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, रोकडे, शेख, राक्षे, शेख, पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page