परिमंडळ ५ मधील लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा …!

यातील आरोपी विठ्ठल बाळासाहेब गुंड व मयत बाळकृष्ण महादेव धस हे नातेवाईक आहेत. सदर घटना ही पाटीलवस्ती, ता. हवेली, जि. पुणे येथे नमूद गुन्हयातील जखमी महिला श्रीमती मंदा महादेव धस यांचे राहते घरी दिनांक २९/०६/२०१६ रोजी रात्रौ १६:२४ वाजताच्या सुमारास घडली आहे. यातील आरोपी विठ्ठल बाळासाहेब गुंड, रा. गुंडवाडी, ता. आष्टी, जि. बीड याने यातील १) मयत बाळकृष्ण महादेव धस २) सौ. मंदा महादेव धस, ३) अमोल महादेव धस ४) बाळकृष्ण महादेव धस व ५) बाळा सुर्यभान गावडे यांना फावड्याच्या लाकडी दांडक्याच्या साहाय्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बाळकृष्ण महादेव धस याचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला व उर्वरित चौघे जबर जखमी झाले. म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ५३१/२०१६ भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, ४५२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

तपास

सदर गुन्हयाचा तपास श्री. रणजितसिंग परदेशी, सहा. पोलीस निरीक्षक, सध्या नेमणूक सायबर शाखा, मुंबई यांनी केला व यातील आरोपीविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. ५०/२०१६ असा आहे.

शिक्षा

वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक ०८/०५/२०२५ रोजी सश्रम कारावासासह जन्मठेप व ९ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

कामगिरी

सरकारी पक्षातर्फे अति. सरकारी वकील श्री. जावेद खान, कोर्ट पैरवी श्रीमती ललिता कानवडे, यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी मपोहवा २१४८ ललिता कानवडे व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि श्री. रणजितसिंग परदेशी यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page