“रुपये १२,५८,१००/- किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल फिर्यादींना परत दिला..!

१) तक्रारदार – प्रविणकुमार मानिकचंद लोढा रा. हेवनपार्क सोसा. फ्लॅट नं. २०३ आदर्श हॉस्पीटल समोर कोंढवा पुणे, यांच्या राहत्या घरी झालेल्या घरफोडी मध्ये तक्रारदार यांच्या घरातील १) सोन्याची चैन वजन २३ ग्रॅम २) सोन्याची चैन वजन १० ग्रॅम ३) सोन्याची अंगठी वजन १० ग्रॅम ४) सोन्याचे मंगळसुत्र वजन ४६ ग्रॅम ५) सोन्याचे मंगळसुत्र वजन २५ ग्रॅम ६) सोन्याच्या ०४ बांगडया वजन ३० ग्रॅम असे एकुण १५ तोळे ग्रॅम वजनाचे १०,६५,६००/- रुपये किंमतीचे दागीने चोरीला गेले होते. सदर बाबत कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं. ६७/२०२५ भा.न्या.सं.क. ३३१(३),३३१ (४),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असता आरोर्पी कडुन अटके दरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. २) तक्रारदार रईसा सादिक शेख रा. नुरेन हाईट्स फ्लॅट नं ३०१,३०२ इमाननगर विजय सेल्स समोर कोंढवा पुणे. यांच्या राहत्या घरी झालेल्या घरफोडी मध्ये तक्रारदार यांच्या घरातील १) सोन्याचे बोरमाळ वजन ०५ ग्रॅम-२) सोन्याचे कानातील रींगा वजन ०५ ग्रॅम-३) सोन्याच्या अंगठी ०२ ग्रॅम ४) सोन्याचे नेकलेस वजन १५ ग्रॅम ५) सोन्याचे गंठण वजन ०४ ग्रॅम ६) सोन्याची अंगठी वजन ०२ ग्रॅम असे एकुण साडेतीन तोळे वजनाचे १,९२,५००/- रुपये किंमतीचे दागीने चोरीला गेले होते. सदर बाबत कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं. ३९/२०२५ भा.न्या.सं.क. ३३१(३),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असता आरोपीं कडुन अटके दरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मा. न्यायालयाच्या आदेशाने वरील नमुद १) अर्जदार प्रविणकुमार मानिकचंद लोढा २) अर्जदार रईसा सादिक शेख यांना साडे आठरा तोळे वजनाचे एकुण १२,५८,१०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परि.०५, पुणे शहर यांच्या हस्ते धन्यकुमार गोडसे सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे, अब्दुल रऊफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस ठाणे यांचे उपस्थितीत परत करण्यात आला आहे. वरिल प्रमाणे कारवाई मा. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा साो. पोलीस सह आयुक्त, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page