प्राथमिक उपचारा अभावी दादर – जालना जन शताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस मध्ये एका महिलेचा दुर्दैवी म्रुत्यू -……

डॉक्टरांच्या प्राथमिक उपचारा अभावी दादर – जालना जन शताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस मध्ये एका महिलेचा दुर्दैवी म्रुत्यू –

Advertisement

दादर स्टेशन वरुन एक वयस्कर महिला जालना जन शताब्दी एक्स्प्रेस बसली त्या महिलेला कुठे जायचे होते माहिती नाही ती महिला एकटीच प्रवास करत होती सोबत कुणीही नव्हते.गाडी मध्ये बसल्या पासूनच मळमळ होत होती आणि चक्कर येत होती
८-१० वेळा ती महिला बाथरूम मध्ये गेली आजुबाजुला असलेल्या बाकिच्या बायांनी सल्ला दिला कि माऊशी बसून घ्या तूम्हाला चक्कर येईल परंतू बेचैनी मुळे ती महिला इकडे तिकडे उठ बस करत होती. नाशिक ते मनमाड दरम्यान
१०० नंबर च्या सीट वर बसली असतांना त्या महिलेला उलटी झाली. आजूबाजूच्या लोकांना वाटले की फिट आले असेल, उलटी केल्यामुळे कोणी जवळ जात नव्हते, ५ मिनिटांनी काही मुस्लिम महिलांनी ते स्वच्छ केले आणि पाणी देऊ लागल्या लागल्या परंतू ती महिला काहिही प्रतिसाद देत नव्हती आणि हातपाय थंड पडले. लोकांना काय करावे हे समजत नव्हते, गाडी मध्ये असणार्‍या टिसी आणि पोलिसांना बोलावले परंतू कोणीही वेळेवर आले नाही. त्या महिलेकडे असणाऱ्या मोबाईल मधील डायल पॅड मधून शेवटचा कॉल लॉग बघून फोन केला असता ती महिला मनमाड ची रहिवासी होती असे समजले.
शेवटी मनमाड रेल्वे स्टेशन वर गाडी थांबली असता पोलिसांनी आणि रेल्वे कर्मचार्‍यांनी त्या महिलेची बॉडी स्टेशन वर उतरवून घेतली.
रेल्वे मध्ये जर डॉक्टर असते आणि वेळेवर उपचार मिळाला असता तर कदाचित ती महिला वाचली असती.
सरकारने ह्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन प्रत्येक रेल्वे मध्ये डॉक्टरांची टिम आणि पोलीस हे अनिवार्य च नियुक्ती केली पाहिजे.
आज आपण एवढ्या विकासाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, बुलेट ट्रेन च्या गप्पा मारतो पण आपत्कालीन परिस्थितीत मदतच मिळाली नाही तर काय फायदा त्या विकासाचा. लोकांना विकास नसला तरी चालेल पण परिस्थितीत मदत मिळाली पाहिजे. दररोज अशा काही ना काही घटना घडतच असतात पण रेल्वे मध्ये प्राथमिक उपचार मिळाल्यास व्यक्तीचा जीव तरी वाचू शकतो सरकारने याकडे गांभीर्याने बघावे

सहा.प्रा. मिलिंद शाळीग्राम पाडेवार नाशिक

वार्ताहार

जन हक्क टाइम्स पुणे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page