मोक्का गुन्हा अंतर्गत सहा महिने फरार चुहा गॅंग यांचा मुख्य सूत्रधार भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन भा. द .वि .कलम कलम 307 ,323, 143 144 ,147, 148 ,149 आर्म अॅक्ट 425 म पो अ 371 3 135 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 31 .(3)(2)3(4 ) या गुन्ह्यातील टोळी चा प्रमुख आरोपी साकिब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान वय23 वर्ष राहणार लुलिया बिल्डिंग चौथा मजला ,कदम चाळ, संतोष नगर. कात्रज पुणे . हा दिनांक 16/ 2/ 2023 पासून फरार होता
सदर टोळीचा प्रमुख आरोपी साकिब मेहबूब चौधरी राहणार लुलिया बिल्डिंग चौथा मजला कदम चाळ संतोष नगर कात्रज पुणे हा गुन्हा घडल्यापासून फराळ कालावधीत तो त्याचे अस्तित्व लपवून वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याची ओळख व ठाव ठिकाण बदलून वास्तव्य करत होता त्याने त्यादरम्यान कात्रज आणि संतोष नगर परिसरात स्वतःचे टोळीचे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता सदर आरोपीचा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी वारंवार बाहेरील माहिती जिल्ह्यांमध्ये गुप्त बातमीदारांचे नेटवर्क सक्रिय करून व तांत्रिक विश्लेषणावरून शोध घेत असताना पोलीस अंमलदार विक्रम सावंत अभिजीत जाधव निलेश डोंगरे यांना आरोपीस साकी मेहबूब चौधरी उर्फ लतीफ भगवान हा मुक्काम पोस्ट नीरा तालुका. पुरंदर, जिल्हा. पुणे. येथे रहात आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथून आरोपी स साकिब मेहबूब चौधरी याचा शोध घेऊन अटक केली
पुढील कारवाई गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री .नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे. यांचे ताब्यात देण्यात आले असून त्यांनी सदर आरोपीस अटक केली आहे. आरोपी साकीब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान हा रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याचे वर यापूर्वी मोक्का गुन्हा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, त्या गुन्ह्यातून त्यास जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व स्थापित करण्याकरता त्याचे साथीदार आणि पुन्हा टोळी तयार करून सदरचा गुन्हा केला आहे .विशेषतः आरोपी साकीब. मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान हा त्याचे टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कात्रज भागातील शिक्षण घेणारे बालकांचा वापर करून त्याचे टोळीची कात्रज भागात दहशत निर्माण करत आहे. सदरची कारवाई माननीय प्रवीण कुमार पाटील ,अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मा श्रीमत पाटील. पोलीस उप. आयुक्त परिमंडल 2 मा .नारायण शिरगावकर., सो.मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग ,पुणे .यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ ,पोलीस उपनिरीक्षक सागर भोसले .पोलीस अंमलदार विक्रम सावंत ,अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे ,चेतन गोरे ,मंगेश पवार, हर्षल शिंदे ,अवधूत जमदाडे ,सचिन सरपाले ,धनाजी धोत्रे, सचिन गाडे ,निलेश खैरमोडे अभिनय चौधरी ,आशिष गायकवाड, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे .
संपादक .
जनहक्क टाइम्स पुणे




