खराडी भागात ड्रग्ज पार्टीवर छापा कारवाई ०५ इसम व ०२ महिला ताब्यात अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त..!

दि.२७/०७/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा श्री. राजेंन्द्र मुळीक, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक वासनिक, महिला पोलीस उपनिरीक्षक लाड गुन्हे शाखा पुणे शहर असे खराडी पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने दि.२७/०७/२०२५ रोजी ०३/२० वा चे सुमा. रूम नंबर १०२, स्टेबर्ड अझुर सुट, हॉटेल, खराडी पुणे याठिकाणी छापा कारवाई केली असता काही इसम हे हुक्का आणि ड्रग्स पार्टी करत असताना मिळुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे १) प्रांजल मनिष खेवलकर, वय ४१ वर्षे, रा. प्लॉट नं. ५७,५८ इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर पुणे, २) निखिल जेठानंद पोपटाणी, वय ३५ वर्षे, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, अॅमनोरा पार्क टाउनचे मागे, माळवाडी रोड, पुणे, ३) समीर फकीर महमंद सय्यद, वय- ४१ वर्षे, रा. २०५, हेरीटेज, पॅलेस ओरचड सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे. ४) सचिन सोनाजी भोंबे, वय- ४२ वर्षे, रा. प्लॉट नं. ५१, द्वारका नगर, डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली पुणे. ५) श्रीपाद मोहन यादव, वय- २७ वर्षे, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, साई होमसच्या पाठिमागे, पंचतारा नगर, पांडरकर वस्ती, आकुर्डी, पुणे तसेच महिला नामे १) ईशा देवज्योत सिंग, वय २२ वर्षे, रा. ए ६, २०३ कुमार बिर्ला सोसायटी वॉर्ड नंबर ८, नागरस रोड, औध पुणे २) प्राची गोपाल शर्मा वय २३ रा. गोदरेज ग्रिन को. म्हाळुंगे पुणे असे सांगितले. त्यांचे ताब्यात २.७० ग्रॅम कोकेन सदृश अमली पदार्थ, ७० ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ, एकुण १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर असा असा एकुण ४१,३५,४००/- रू.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत खराडी पोलीस स्टेशन गु.र.नं.१५४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) (11) अ, २१ (ब), २७कोटपा ७(२),२० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२, श्री. राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक वासनिक, सहा.पो.निरी. राजेश माळेगावे, सहा.पो.निरी. नितिनकुमार नाईक, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व पोलीस अंमलदार गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page