अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन त्याचा खुन करुन पश्चिम बंगाल येथे पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत पश्चिम बंगाल येथून अटक..!

दि.१०/०२/२०२५ रोजी तोरणा मोहर बिल्डिंग, चिंतामणी चौकाचे जवळ आंबेगाव पठार पुणे येभील बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहील्या मजल्यावर फलॅट क्रमांक १०४ मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने, सदरचे अनोळखी इसमास, कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मাকল, त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खून केला आहे म्हणुन पोलीस अंमलदार राहुल लक्ष्मण आवारी नेमणुक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ११४/२०२५ भारतीय न्याय सहीता कलम १०३ (१) अन्यये गुन्हा आला आहे. दाखल गुन्हयातील ममत इसमाची बॉडी ही DICOMPOSEO होवु लागल्यामुळे मयताचे चेहरा नीट दिसत नव्हता मयताबाबत घटनास्थळावरील नागरीकांकडे विचारणा केली असता मयत इसमाबाबत काही उपयुक्त माहीती मिळाली नाही. त्यामुळे मयत इसमास ओळखणे हे पोलीसांना कठीण झाले होते. भारती विद्यापीट पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व पोलीत अंमलदार यांना मयत इसमाची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीट पोलीस स्टेशनचे तपास पभकाचे अधिकारी निलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यानी घटनास्थळावर मिळून आलेल्या रक्ताने माखलेल्या मोबाईल फोगया तांत्रिक तपास केला असता त्यावरुन मयत इसमाचे गाव नयन गोरख प्रसाद, वय ४५ वर्षे, रा. मुळ रा. गाव दुमडा, तहसील तारवारा, जि. सिवान, बिहार असे असल्याची खात्री झाली. त्यापुढे मयत इसम गयन गोरख प्रसाद याचे मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यामध्ये मयत इसमाचे सोबत बिरण सुबल करकर. ऊर्फे बिरण सुबल कर्माकर, वय ३० वर्षे, रा. बजे बिडोल, हिंडोले, रायगंज, परीवाल, उत्तर दिनाजपुर. पश्चिम बंगाल ७३३१५६ हा इसम असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली आरोपी बिरण सुबल करकर, ऊर्फ बिरण सुबल कर्माकर याचा शोध घेत असताना तो पश्चिम बंगाल येथे गेल्याची माहीती मिळाल्याने वरीष्ठांचे मार्गदर्शनखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगाल येथे जावुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो हावडा रेल्वे स्टेशन भागात मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात गोलाबारी पोलीस स्टेशन, हावडा, पश्चिम बंगाल येथे दि.१२/०२/२०२५ परोप्नी अटक करण्यात आली आहे.
सवरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री.प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील मा. पोलीस उप आयुक्त. आर्थिक व सायबर गुन्हे शाखा. पुणे श्री. विवेक मासाळ मा सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे. मितेश चोरमोले. अभिनय चौधरी, सागर बोरगे, यांनी केली आहे.




