‘मी इथला भाई’ म्हणत एकावर कोयत्याने वार; पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे : ‘मी इथला भाई आहे. माझा इतिहास पोलिसांना विचार,’ असे म्हणत दोघांनी एकावर कोयत्याने वार केले. तसेच व्यक्तीच्या खिशातील रोकड जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना पाटीलनगर, चिखली येथे घडली. या प्रकरणी सुनील रमेश खरात (रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय कांबळे (वय २०, रा. पाटीलनगर चिखली), तांडव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

Advertisement

फिर्यादी हे जेवण करण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ‘मी तुला लय दिवसापासून पाहतो. तू मला खुन्नस देतो. तुला लय मस्ती आली का. मला तू ओळखले नाही. मी इथला भाई आहे. माझा इतिहास पोलिसांना विचार. मग तुला समजेल’, असे म्हणत अजय आणि तांडव या दोघांनी खरात यांच्याशी झटापटी केली. अजय याने कोयत्याने खरात यांच्यावर वार केले. तसेच त्यांच्या खिशातील ४३० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page