हडपसर रिक्षा स्टॅन्ड परिसरात दहशत माजवणा-या आरोपीस केले जेरबंद..!

हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ११८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२) ३२४ (४), भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ क्रिमीनल लॉ अॅमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ३ व ७ यातील फिर्यादी हे गाडीतळ हडपसर पुणे येथील रिक्षा स्टॅन्डवर असताना, इसम नामे बाळु डोके रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ हडपसर पुणे याने फिर्यादीस २ हजार रुपये महिना दयावे लागतील नाहीतर रिक्षा स्टॅन्डवर धंदा करुन देणार नाही असे म्हणून त्याचे हातातील लोंखडी हत्यार हवेत फिरवुन या ठिकाणचा भाई आहे या ठिकाणी कोणाला धंदा करावयाचा असेल तर सर्वाना हप्ता रूपात पैस दयावे लागतील असे म्हणून फिर्यादी यांचे रिक्षाची काच फोडून नुकसान केली. तसेच सदर भागात दहशत निर्माण केली. सदर गुन्ह्यातील आरोपी हा अभिलेखावरिल गुन्हेगार असून नुकताच तडीपार कारवाईतुन मुक्त झालेला आहे. दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून आरोपीचा शोध घेत असताना तो राहते घरी मिळून येत नव्हता. त्याच्या बाबत बातमीदारामार्फत खात्रीलायक माहीती मिळताच बाळु भिमराव डोके, वय ४८ वर्षे रा. सर्वे नं. ५, वेताळबाबा वसाहत, अमीन चिकन सेंटर शेजारी, गाडीतळ, हडपसर, पुणे घेवून यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर श्री. डॉ. राजकुमार शिंदे, मा.सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, श्री.अमर काळंगे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, भगवान हंबर्डे, अजित मदने, यांनी केली.

Advertisement

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page