लातूर हादरलं ! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार करून केली हत्या; 3 दिवस मृतदेह घरातच

लातूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकानंतर एक विकृत मनोवृत्तीच्या घटना घडण्याचं सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच एक धक्कादायक घटना लातूरमधून समोर आली आहे. एका ३१ वर्षीय व्यक्तीने ७० वर्षीय महिलेवर चार दिवस बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. तीन दिवस या महिलेचा मृतदेह घरातच पडून होता. सदर घटना लातूर जिल्ह्यातील भेटा या गावात घडली आहे. या घटनेतील आरोपीला भादा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
नेमकं काय आहे घटना?
लातूरच्या औसा तालुक्यातील भेटा गावातील 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीची आई बाहेरगावी गेली होती. आरोपी मन्सूर होगाडे याने महिलेला घरी बोलावलं. 31 वर्षांच्या मन्सूरने 70 वर्षांच्या महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. तीन दिवसांने आरोपीची आई घरी परतली. घरात महिलेचा मृतेदह पाहताच ती हादरली आणि याची माहिती तीने पोलिसांना दिली. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत आरोपी मन्सूर होगाडेला ताब्यात घेतलं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावात पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




