नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद्यासाठी कौशल्य रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम(सुतारकाम/शिवणकाम/क्राफ्ट बेकर)

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर यांचेकडे नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर यांनी व्ही.टी.पी. (VTP) नोंदणी करणे बाबत कार्यालयीन पत्र व्यवहार करण्यात आले. सोबत ग्रीन जॉब नुसार १४ विषयावर कौशल्य प्रशिक्षण करिता सदरील विभागाची मान्यता मागण्यात आली
सदरील कार्यालयीन पत्र व्यवहार व वेळोवेळी कार्यालयीन भेट / समन्वय करून नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूरचे व्ही.टी.पी.(VTP) नोंदणी करण्यात आले. सोबत तीन विषयानुसार प्रशिक्षण घेण्याची मान्यता मिळाली आहे. VTP No –MSBG31006 (Nagpur Central Prison, Nagpur) स्वयंरोजगार शिवणकाम, क्राफ्ट बेकर, सहाय्यक सुतारकाम हे तीन प्रशिक्षण आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली.
व्ही.टी.पी. नोंदणी व मान्यता प्राप्त विषयानुसार १८ ते ४५ वयोगटातील बंदीबांधव यांना कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यास आदेश देण्यात आले त्यात प्रती बॅच ३० विद्यार्थी आहे. सोबत सदरील कौशल्य प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या कारागृहातील बंदी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे, त्याचेकडे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.
सदरील कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी बंद्यांचे आलेल्या यादीनुसार त्यांच्या कुटुंबियांना फोनद्वारे संपर्क साधून बंदीचे आधार कार्ड मागवुन घेण्यात आले, कौशल्य रोजगार प्रशिक्षण नागपूर VTP ID MSBG31006 (NGP) आय.डी. वर ऑनलाईन द्वारे बंदीबांधव यांचे आलेल्या आधार कार्ड नुसार ऑनलाइन नोंदणी करण्यात आले.
एकंदरीत स्वयंरोजगार शिवणकाम, क्राफ्ट बेकर, सहाय्यक सुतारकाम इत्यादी विषयानुसार कौशल्य रोजगार प्रशिक्षण दिनांक ०१.१०.२०२४ पासून प्रती दिवस ५ तास ९० बंद्यासाठी तीन प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले आहे.
सदरील प्रशिक्षण जवळ पास तीन महिने कालावधीचा असून प्रशिक्षणार्थी बंद्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र,महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरील प्रमाणपत्र च्या आधारे बंदी मुक्त झाल्यावर जॉब तथा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज / अनुदान त्यांना मिळू शकेल तथा सदरील लाभार्थी स्वतःच्या पायावर उभा होईल ह्याच उद्देशाने मा. वैभव आगे, अधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारागृह यांनी व्ही.टी.पी. नोंदणी करून प्रशिक्षण सुरु होण्यास पर्यंत केलेत.

Advertisement

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page