किरकोळ कारणातून तरुणाला बेदम मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता किरकोळ कारणातून चौघांनी तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. झटापटी तरुणाच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाची सोनसाखळी गहाळ झाली आहे. याप्रकरणी, अक्षय अरविंद मोरे (वय. 29,रा. धनकवडी) याने सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि.14) दुपारी एक वाजताच्या सुमारास कोणार्क विहार सोसायटीच्या समोर धनकवडी येथे घडली आहे.
तक्रारादर तरुण गाडीने के.के. मार्केट येथून तीन हत्ती चौकाकडे जात होता. त्यावेळी त्याच्या समोरून दुचाकीवरून दोघे जोरात गेले. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे पाहिले. त्याचा राग त्यांना आला. त्यातून ते दोघे परत वळून आले. राघाने पाहून तु मला डबल देतो का, तु मला ओळखत नाही का, तुला घालवून टाकेल असे म्हणून आपल्या इतर दोघा साथीदारांना बोलावून घेतले. चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. झटापटीत तरुणाच्या गळ्यातील २४ ग्रॅम सोन्याची चैन कोठेतरी पडून गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




