पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुचं; फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल लाखोंचा ऐवज लंपास

पुणे : हडपसर परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ५ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनंता पवार (वय ६२, रा. धारवाडकर कॉलनी, गोपाळपट्टी, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त गावी गेले होते. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडले. तसेच, बेडरूमध्ये घुसून कपाट उचकटून चोरट्यांनी ४ लाख ८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पवार कुटुंबीय सोमवारी गावाहून परतले. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page