नागपुरात पोलिसांनी १ कोटी ३५ लाखांची रोकड केली जप्त; तरुणाला अटक

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग जोरदार कामाला लागले आहे. राज्यामध्ये सर्व ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले असून कसून चौकशी केली जात आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी आयोग कार्यरत आहे. निवडणूक अधिकारी राजकीय नेत्यांची देखील तपासणी करत असल्यामुळे राजकारण तापले आहे. यामध्ये आता नागपूरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री मोपेडवरून १ कोटी ३५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

Advertisement

शाबीर खान हाजी नासिर खान (27) असे रोकड घेऊन जात असलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पुढे आलीय. एक व्यक्ती मोठी रोकड घेऊन जाणार असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्याला शोधून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे रोकड मिळाली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीची विचारपूस केल्यावर एवढ्या रकमेबद्दल समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्या व्यक्तीनं उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण रक्कम ताब्यात घेत निवडणुकीच्या काळातील नियमाप्रमाणे कारवाई केली आहे. ही रोकड नेमकी कोणाची यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page