कॉपर चोरणारी टोळी वाघोली पोलीसांकडून जेरबंदः चोरट्यांकडुन १३,४४,८१७/- रू चा मुद्देमाल जप्त.😮

वाघोली पोलीस स्टेशन, मु.र.नं. १०२२/२०२४, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३ (२), ३३४(२), ३(५) अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी कामास असलेल्या अॅग्रीको एनर्जी रेंटल इंडीया प्रा लि या कंपनीमधून १७,५१,२७५/- रू किंमतीचे तांब्याच्या ताराचे विविध कंपनीचे ७३ बंडल चोरी केले बाबत लोणीकंद पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोली पोलीस पोस्टे मध्ये घडलेल्या गुन्हयाचे अनुषंगाने मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, हिम्मत जाधव, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ४ पुणे शहर, व मा. श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त सोो, येरवडा विभाग, पुणे शहर यांनी पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणनेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
नमुद गुन्हयाचा तपास चालू असताना पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी गुन्हे शोध पथकाचे शिरीष भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. प्रशांत कर्णवर, पो. शि. दिपक कोकरे, पो. शि. विशाल गायकवाड, पो. शि. प्रितम वाघ यांना गोपनीय माहीती काढण्याच्या व सी. सी. टी. व्हि. कैमेरे चेक करण्याच्या सुचना दिल्या त्याप्रमाणे त्यांनी सी. सी. टी. व्हि. कॅमेरे चेक करून पोर्टर ट्रान्सपोर्ट लॉजिस्टीकची पिकअप असल्याचे निष्पन्न केले त्या अनुषंगाने पोर्टर कंपनीकडे कौशल्यपुर्ण विचारपूस करून गाडीचा नंबर निष्पन्न केला. सदर गाडीबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहीती काढून गुन्हयात वापरलेले पिकअप वाहन चालक नामे १) जमाल अब्दुल रहमान, वय ५३ वर्षे, रा. फ्लॅट नं २०१, जैस्मीन रेसीडेंन्सी, लेन नं ७. सातवनगर, हडपसर, पुणे याचेसह हांडेवाडी पुणे येथून ताब्यात घेवून चालकाकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदर गुन्हा इसम नामे २) अनिल रिखीराम गुप्ता, वय ३७ वर्षे, रा. लक्ष्मी माता मंदीराचे बाजूला, भारतनगर झोपडपट्टी, कत्तारवाडी, विश्रांतवाडी, पुणे, ३) शिवम बजरंगी कश्यप, वय २२ वर्षे, रा. टिंगरे यांचेकडे भाडयाने, श्रीहंसनगर, धानोरी, पुणे मुळ रा. मुलीयामहू, थाना भाधोका, जिल्हा रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश, ४) विशाल पप्पू कश्यप, वय २० वर्षे, रा. टिंगरे यांचेकडे माडयाने, श्रीहंसनगर, धानोरी, पुणे मुळ रा. कैथंग पुरवा, थाना भाधोका, जिल्हा रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश यांचे मदतीने केल्याचे कबुल केले. लागलीच तपास पथकाचे मार्फतीने वेगवेगळ्या टीम करून त्यांना विश्रांतवाडी, धानोरी येथून ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपी अनिल गुप्ता याने त्याचे साथीदारांसह सदर गुन्हयातील चोरी केलेल्या तांब्याच्या तारा विकून टाकल्याबाबत माहीती दिली असून गुन्हयात वापरलेली पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे.
सदर आरोपी अटकेत असताना त्यांचेकडे कौशल्यपूर्ण विचारपुस केली असता याच आरोपीतांनी यापुर्वी दिनांक २२/१०/२०२४ रोजीचे रात्री लोणीकंद येथील जयवंत वेअर हाऊस मध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याने व आरोपी अनिल गुप्ता याचे धानोरी येथील गोडावून मधून १) १०,९४,११७/- किंमतीचे कॉपर वायरचे एकुण ६२ बंडल कि. अं. २) ७००/- रू किंमतीच्या १ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा कि. अं. असा
एकुण १०,९४,८१७/- रू किंमतीचा माल जप्त करून लोणीकंद पोस्टे कडील गु र नं १००६/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५, ३३४(१), ३३१ (४) उघडकीस आणण्यात वाघोली पोलीसांना यश आले आहे.
एकंदरीत वाघोली पोलीसांनी वाघोली पोस्टे कडील गु.र.नं. १०२२/२०२४, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३ (२), ३३४ (२), ३(५) व लोणीकंद पोस्टे कडील गु र नं १००६/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५, ३३४(१), ३३१ (४) उघडकीस आणून चार आरोपीतांना अटक करून १०,९४,८१७/- रू च्या कॉपर वायर व २,५०,०००/- रू ची पोर्टर ट्रान्सपोर्टेशन लॉजिस्टीकची पिकअप असा एकुण १३,४४,८१७/- रू चा मुद्देमाल जप्त केला
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. हिम्मत जाधव साो, पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पंडीत रेजितवाड सारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस ठाणे, पुणे शहर, गुन्हे शोध पथकाचे सपोनि शिरीष भालेराय, पो. हवा, प्रशांत कर्णवर, पो. शि. दिपक कोकरे, प्रितम वाघ, विशाल गायकवाड यांनी केली आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




