दिवसा केलेली घरफोडी वाघोली पोलीसांकडून उघडकीस, चोरट्याकडून ४३ ग्रॅम ३६० मिली ग्रॅम सोने जप्त😮

वाघोली पोलीस स्टेशन, गु.र.नं. १०४२/२०२४, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३३१ (३), ३०५ अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी नामे प्रसाद फक्कड चेडे, वय २८ वर्षे, रा. वाघोली, पुणे याने त्याचे घरातील कपाटामधील सुटकेस मध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र, चैन, आंगठी, झुबे, नथ व मणी असे एकुण ६० ग्रॅम ८०० मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने चोरी केल्या बाबत तक्रार दिली होती.

नमुद गुन्हयाचा तपास चालू असताना पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे सपोनि भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा प्रशांत कर्णवर, पो. शि. दिपक कोकरे, प्रितम वाघ, विशाल गायकवाड यांनी सी. सी. टी. व्हि. च्या व गोपनीय बातमीदाराच्या आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे राहूल सुभाष राठोड, वय ३० वर्षे, रा. दत्तविहार, वडजाई, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे मुळ रा. दहीफळ खंदारे, ता. मंठा, जि. जालणा त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांचेकडे कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने दाखल गुन्हयात एकुण गेले माला पैकी ४३ ग्रॅम ३६० मिली ग्रॅम वजनाचे ३,३८,२०८/- रू किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, झुबे व सोन्याची लगड असा माल आरोपीकडून जप्त केला आहे. आरोपीस दिनांक ०१/११/२०२४ रोजी अटक केली असून त्यास मा. न्यायालयाने ०३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली रिमांड सुनावली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि श्री. शिरीष भालेराव हे करीत आहेत

Advertisement

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. हिम्मत जाधव साो, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त सोो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पंडीत रेजितवाड साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस ठाणे, पुणे शहर, गुन्हे शोध पथकाचे सपोनि शिरीष भालेराव, पो. हवा. प्रशांत कर्णवर, पो. शि. दिपक कोकरे, प्रितम वाघ, विशाल गायकवाड, यांनी केली आहे.

संपादक -आरती बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page