तडीपार तरीही पुणे शहरात; दोन दिवसांत ३ तडीपार अटकेत

पुणे : विधानसभा निवडणूक आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सराईतावर लक्ष केंद्रित केलेले असताना तडीपारांचा वावर मात्र शहरात असल्याचे दिसत आहे. दोन दिवसात पोलिसांनी तडीपार असताना शहरात दाखल झालेल्या ३ गुन्हेगरांना पकडले आहे. हद्दपारीचे उल्लंघन करून ते शहरात आले होते.
अतिश सूरज बाटूंगे (२५, केशवनगर, मुंढवा), मयूर दत्तात्रय थोरात (२५, रा. नाना पेठ), दत्तात्रय मारुती कानगुडे (२७, रा. पार्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, धीरज रंगनाथ आरडे (२८, रा. तळजाई) याने हद्दपार नियमांचे उल्लंघन केल्याचे मिळून आले असून त्याला पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी शहरातील पर्वती, मुंढवा, समर्थ आणि सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि सातत्याने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई केली जाते. संबंधित विभागाचे पोलीस उपायुक्त आरोपींवर कारवाई करून गुन्ह्याच्या स्वरूपानुसार आरोपीला एक, दीड किंवा दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते. मात्र, तडीपारीची कारवाई केल्यानंतरही हे गुन्हेगार शहरात दाखल होत वास्तव्य करत आहेत. वारंवार प्रकार समोर येत असल्याने पोलिसांनी या तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवून आहेत. यात आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे या कालावधीत गुन्हेगारी कृत्ये घडू नये, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. मागील दोन दिवसात शहर परिसरातून तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मुंढवा, पर्वती, समर्थ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही कारवाई केली जात आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




