पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

पुणे : पुण्यात फसवणूकीचे सत्र सुरूच आहे, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज फसवणूकीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता पोलिस असल्याची बतावणी करीत एका व्यक्तीच्या नावाने खोटे पासपोर्ट आणि अमली पदार्थ पार्सलद्वारे आल्याचे सांगितले. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून केव्हाही अटक होऊ शकते, अशी भीती घालत व्यक्तीची सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना शिवकॉलनी, वाकड येथे घडली. या प्रकरणी ३१ वर्षीय व्यक्तीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

आरोपीने फिर्यादीला फोन करून फोनवरील व्यक्तीने तो फेडेक्स कुरिअर कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने खोटे पासपोर्ट व अमली पदार्थ असलेले पार्सल आल्याचे सांगत याप्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचेही सांगितले. त्यानंतर फोनवरील दुसऱ्या व्यक्तीने तो सायबर पोलिस असल्याची बतावणी करीत त्याने त्याचे नाव प्रदीप सावंत असे सांगितले. फिर्यादीचा आधार कार्ड क्रमांक मनी लॉन्ड्रींग, हवाला, काळा पैसा यासाठी वापरला असून हा खूप गंभीर गुन्हा आहे. त्यामध्ये तुम्हाला कधीही अटक होऊ शकते, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास भाग पाडून त्यांची सहा लाखांची फसवणूक केली.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page