पुणे हादरलं, कोंढव्यात भररस्त्यात वाळू व्यावसायिकावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

पुणे : गणेश विसर्जनाच्या तोंडावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. शहरामध्ये गणपती उत्सवाची धामधूम सुरू असतानाच वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील साळवे नगर येथे वाळू व्यावसायिकावर दुपारी 1 वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. वाळू व्यावसायिकाचे नाव दिलीप गायकवाड असे आहे. हा हल्ला पूर्व वैमानस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Advertisement

साळवे गार्डन येथे दोन अज्ञात तरुणांनी त्या वाळू व्यावसायिकांवर गोळीबार केला आहे. त्या अज्ञात तरुणांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या वाळू व्यावसायिकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page