करुणा शर्मा यांचा उमेदवारी अर्ज बाद, ढसाढसा रडत धनंजय मुंडेंवर केले गंभीर आरोप

राज्यात निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. ४ तारखेला अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. तर २० तारखेला निवडणूक होऊन २३ तारखेला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. करुणा शर्मा यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. इंस्टाग्रामवर त्यांनी या बाबत व्हिडिओ केला असून यात उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्या रडतांना दिसत आहेत.

Advertisement

अर्ज बाद झाल्याबद्दल त्यांनी धनंजय मुंडे यांना खडेबोल सुनावले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीच राहिलेली नाही. मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. परळीत सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा सपोर्ट नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून अर्ज भरला होता. असा भावना करुणा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, तो राक्षस आहे. मी २६ वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं. एक महिला स्वत:चं अस्तित्व गमावून, पतीचं अस्तित्व बनवत असते. तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही तर तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे. तू एका महिलेला भीत आहेस. इतिहास याचा साक्षीदार आहे. माझ्या मागे कोणत्याही पक्षाचा आधार नसताना पैशांचं बळ नसताना मी निवडणुकीला उभी राहत होते, असे म्हणत करुणा शर्मा यांना रडू कोसळलं.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page