महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, ‘या’ आमदारांनी घेतली शपथ

मुंबई – राज्यपाल नियुक्त 12 पैकी सात सदस्यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपच्या तीन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येकी दोन सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. विधानपरिषद उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांनी ही शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
या सदस्यांनी घेतली शपथ
चित्रा वाघ (भाजप)
विक्रांत पाटील (भाजप)
बाबूसिंग महाराज राठोड (भाजप)
मनीषा कायंदे (शिंदे गट)
हेमंत पाटील (शिंदे गट)
पंकज भुजबळ (अजित पवार गट)
इद्रिस नायकवडी (अजित पवार गट)
सात आमदारांची यादी संविधान बाह्य – संजय राऊत
हे सरकार घटनाबाह्य आहे. यावरील याचिका आणि निकाल प्रलंबित आहे. अद्याप निकाल आला नाही. तरीही निवडणुकीच्या आधी विविध जाती धर्माच्या सदस्यांना शपथ देताय. हे घटनाबाह्य काम केलंय. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यपालांच्या द्वारे हे काम केलं आहे. आम्ही पाठवलेल्या यादीला एक न्याय आणि एकाला दुसरा न्याय दिला आहे. सात विधान परिषद आमदार नियुक्ती विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. पहिली यादी प्रलंबित असताना दुसरी यादी कशी काय मान्य करताय. हे आमच्यासाठी धक्कादायक आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




