खडकी बाजारात चोरट्यांनी महिलेला लुटले, ४ लाखांचे सोन्याचे गंठण केले लंपास

पुणे – पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खडकी परिसरात दिवाळीनिमित्त कपडे खरेदी करून दुकानाच्या पायऱ्या उतरत असताना महिलेच्या गळ्यातील ४ लाखांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. भरवर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडला आहे. गर्दी अन् दुकानाच्या पायऱ्यावर गळ्यातील गंठन हिसकावल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार दापोडी येथे राहण्यास आहेत. त्या खडकी बाजार येथील खडकी बिजनेस सेंटर येथे कपडे खरेदी करण्यास आलेल्या होत्या. प्रकाश क्लॉथ सेंटर या दुकानात त्यांनी कपड्यांची खरेदी केली. रात्री साडे सातच्या सुमारास त्या दुकानात परत निघाल्या होत्या. दुकानाच्या पायऱ्या उतरत असतानाच पाठिमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्याजवळ येत गळ्यातील ४ लाखांचे सोन्याचे गंठन जबरदस्तीने हिसकामारून चोरून नेले.
चोरटा गर्दीतून वाट काढत साथीदारापर्यंत पोहचला अन् दुचाकीवर बसून पसार झाला. महिलेने आरडाओरडा केला, पण चोरटे पसार होण्यात मात्र यशस्वी झाले. ऐन गर्दीत अन् सेंटरमध्ये शिरून चोरट्यांनी महिलेला टार्गेट केल्याने या चोरट्यांचे देखील धाडस वाढल्याचे दिसून येत आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




