फटाके फोडताना स्फोट झाल्याने मुले जखमी; नऱ्हे भागातील धक्कादायक घटना

पुणे : सोसायटीतील गटाराच्या झाकणावर फटाके फोडताना अचानक स्फोट झाल्याने पाच मुले जखमी झाल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली आहे. या घटनेची नोंद सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नऱ्हे भागातील एका सोसायटीच्या आवरात चेंबरच्या झाकणावर मुले फटाके फोडत होती. एकाने चेंबरच्या झाकणावर फटाका फोडला. त्यावेळी स्फोट झाला आणि गटाराचे झाकण तुटले.

Advertisement

झाकणाचे तुकडे लागल्याने दोन मुले जखमी झाल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत पाच मुले जखमी झाली आहेत. या घटनेचे चित्रीकरण सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page