शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी

पुणे – महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांची उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
शरद पवार गटाची तिसरी यादी
१. ज्ञायक पटणी – करंजा
२. अतुल वांदीले – हिंघणघाट
३. रमेश बंग – हिंगणा
४. फहाद अहमद – अणुशक्ती नगर
५. राहुल कलाटे – चिंचवड
६. अजित गव्हाणे – भोसरी
७. मोहन जगताप – माझलगाव
८. राजेसाहेब देशमुख – परळी
९. सिद्धी कदम – मोहोळ




