पिंपरी- चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 3 जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

पिंपरी- चिंचवड शहरातील भोसरीमध्ये पाण्याची टाकी कामगारांच्या अंगावर कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा ते सात कामगार गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दल, पिंपरी- चिंचवड पोलीस दाखल झाले आहेत.

लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं.

Advertisement

बिल्डरने तकलादू बांधलेल्या पाण्याची टाकीमुळे ही दुर्घटना घडल्याच सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तेथे धाव घेतली आहे. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page