गांज्याची विक्री करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद..!

दि.०४/०८/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना मंतरवाडी कात्रज रोड, मेट्रो मोटर्स समोर सार्वजनिक रोडवर हांडेवाडी, ता. हवेली, जि. पुणे. येथे रेकॉर्ड वरील आरोपी नामे अनिल ऊर्फ आण्णा सुभाष राख वय ४६ वर्षे, रा. प्रगतीनगर, प्रगती गणपती मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर पुणे हे त्याचे जवळील काळया रंगाच्या महिन्द्र थार फोर व्हिलर गाडी मध्ये संशयस्पदरित्या बसलेला मिळुन आला. सदर ठिकाणी झडती घेतली असता त्याचे गाडीच्या मागील सिटवर ५,३६,०००/-कि.चा एका पिवळया हिरवट रंगाच्या नायलॉनच्या पोत्यामध्ये भरलेले १५ पॅकेट असा एकुन २६ किलो ८० ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आल्याने, सदर मालासह महिन्द्र कंपनीची थार फोर व्हिलर व मोबाईल असा एकुण २१,१६,०००/-रु.किं.चा. मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, त्याच्या विरुध्द फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं २४६/२०२५, एन.डी.पी.एस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पो. आयुक्त, गुन्हे-२ श्री. राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, दयानंद तेलंगे, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के, नागेश राख, नितिन जाधव, सुहास डोंगरे, विपुन गायकवाड, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के व फुरसुंगी पोलीस स्टेशचे पोलीस उप निरीक्षक माने, महिला पोलीस उप निरीक्षक बेग, कदम, गायकवाड यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page