खेड-शिवापूर टोलनाक्यावर कारमध्ये सापडल्या 5 कोटींच्या नोटा; पैसे नेमकं कोणाचे?

पुणे : विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असताना राज्यात आचारसंहित लागू झाली आहे. अशातच पुण्यातील पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांनी काल पाच कोटींची रक्कम जप्त केली. पोलिसांनी गाडीचालकाची चौकशी करून त्याला सोडून दिले आणि रोख रक्कम जप्त केली. तर ही रक्कम ज्या वाहनातून जप्त करण्यात आली, त्या वाहनमालकाचे नाव अमोल नलावडे असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान कार पकडली आहे. इनोव्हा क्रिस्टा ही कार आहे. ही कार सांगोल्याची आहे. नलवडे नावाच्या व्यक्तीची ही गाडी आहे. या कारमधून ही रोकड सांगोल्याला नेण्यात येणार होती. ही कार सत्ताधारी नेत्यांच्या संबंधित व्यक्तीची आहे. पुणे ग्रामीण पोलिस या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. काही वेळात याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू केलीय. अशातच काल रात्री राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीत 5 कोटींची रोकड आढळून आली. आता यावर शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची ही गाडी असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र पोलिसांपासून ते निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत जो तपास सुरू केला जातोय, त्याबाबत अजूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या गाडीतील रक्कम नेमके कोणाची होती आणि कोणत्या मतदारसंघासाठी नेण्यात येत होती, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page