तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडली; गोळी पायात घुसल्यामुळे मुलगा जखमी

पुणे – राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मंत्री सावंत यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने कपाटामध्ये ठेवलेल्या रिव्हॉल्वरला धक्का लागला आणि सुरक्षारक्षकाच्या घरातच गोळीबार झाला. या घटनेमध्ये त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना पुण्यातील धनकवडीमधील वनराई कॉलनी येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

सुरक्षा रक्षकाने गोळ्यांनी भरलेली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवली होती. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून मुलाच्या पायात घुसली. यात मुलगा जबर जखमी झाला आहे. अभय शिर्के (वय १३) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय ४०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवृत्त जवान नितीन हनुमंत शिर्के हे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत.

Advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिर्के हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या या रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन ती बॅग कपाटात ठेवली होती. याबाबत त्यांनी कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घेण्यासाठी कपाट उघडले. त्यावेळी त्याचा धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडली व त्यातून गोळी सुटली. ही गोळी अभयच्या उजव्या पायाच्या पोटरीत घुसली. या घटनेत मुलगा जबर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page