मोठी बातमी! मला मुख्यमंत्री करा, अजित पवारांची अमित शाहांकडे मागणी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगणार आहे. त्यासोबतच सध्या या दोन्हीही युतींमधील घटकपक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यापुढे अजित पवारांनी हा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Advertisement

अमित शाह रविवार आणि सोमवार या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबई दौऱ्याचा समारोप झाल्यानंतर त्यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी मुंबई विमानतळावरच महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला. “निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्री करा. महाराष्ट्रातही ‘बिहार पॅटर्न’ राबवा,” असा प्रस्ताव अजित पवारांनी गृहमंत्री शाहांपुढे ठेवला आहे.

एकीकडे निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होती अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फड़णवीस आपली हुकलेली मुख्यमंत्री पदाची संधी मिळवण्यासाठी तयारी करत आहेत. त्यातच आता अजित पवारांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केल्यामुळे आगामी काळात महायुतीत मुख्यमंत्री पदावरून मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page