पुण्यातील गोपाळकृष्ण शाळेत अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांनी बातम्यांचे केले वाचन

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या ‘ प्रशालेतील निरनिराळ्या उपक्रमांच्या निवडक बातम्यांचे वाचन ‘ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. प्रशालेतील निरनिराळ्या उपक्रमांच्या निवडक बातम्यांचे सामूहिक वाचन यावेळी विद्यार्थ्यांनी केले.
प्रशालेत वर्षभर विद्यार्थ्यांकरिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, नवोपक्रम राबविले जातात. त्यामुळे ‘ उपक्रमशील शाळा ‘ अशी शाळेची नव्याने ओळख निर्माण झाली असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी सांगितले.
सदर उपक्रम उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी दिपाली गावडे, विशाल चव्हाण उपस्थित होते.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




