धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेमध्ये 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

चंद्रपूर : चंद्रपूरमध्यचे जिल्हापरिषदेच्या शाळेमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेच्या शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघकीस आला आहे. शिक्षिकेने जबर मार दिल्यानंतर दोन विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना जवळच्या सावली ग्रामीण रुग्णालयातही भरती करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून सर्वांनी यावर रोष व्यक्त केला आहे.

दोषी शिक्षिकेवर कारवाईची मागणी

Advertisement

या शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील तब्बल 17 विद्यार्थ्यांना मारले असून यातील दोन विद्यार्थिनींवर सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. चंद्रपुरातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विषय शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या उज्वला पाटील या शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याने मुलींना त्रास झाला असून दोषी शिक्षिकेवर कारवाई करण्याची पालकांची मागणी आहे. माझ्या पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिसळवले असा आरोप करत या शिक्षेकेने विद्यार्थ्यांना बेदम मारलं आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page