भारती विद्यापीठ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी….
भारती विद्यापीठ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
दिनांक२५/०५/२०२३ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जबरदस्तीने हप्ता मागणाऱ्या अजय पांचाळ तेजस वाडेकर .सोहेल आसंगी .गोविंद लोखंडे ,सोन्या कांबळे अमोल डावरे यांना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक.
गुन्हेगार अजय पांचाल हा गुन्हेगार सध्या जेलमधून बाहेर येऊन दारूच्या दुकानांमध्ये तिने हप्ते मागत व दुकानांची तोडफोड, दगडफेक केल्याची तक्रार रोजी 24/05/2023सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस येथे करण्यात आली या संदर्भात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव , राहुल तांबे , विक्रम सामंत यांनी गोपनीय बातमीदारांच्या मार्फत गुन्हेगारांना अटक केली
सदरची कारवाई मा. श्रीमती पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ, नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार , तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे )विजय पुराणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सचिन धामणे, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, विक्रम सावंत, शैलेश साठे , चेतन गोरे,निलेश ढमढेरे , मंगेश पवार, हर्षल शिंदे अवधूत जमदाडे , सचिन सरपाले, सचिन गाडे , धनाजी धोत्रे , निलेश खैरमोडे , अभिनय चौधरी नितीन जाधव, यांच्या पथकाने केली या कामगिरीचे करावे तेवढे कौतुक कमीच …
जनहक्क times पुणे




