नात्यातील मुलीची छेड काढल्याने तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे: पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना देखील सातत्याने घडत आहेत. कोयता गॅंग, हीट अँड रन प्रकरण असे गुन्हे पुण्यात सातत्याने घडतंय दिसत आहेत. दरम्यान, दांडेकर पुल परिसरात नात्यातील तरुणीची छेड काढत असल्याच्या रागातून टोळक्याने तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी काही तासातच फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडले.

Advertisement

कौस्तुभ जयदीप नाईक (वय २९, रा. सदाशिव पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पंकज नांगरे (वय ३१, रा. दांडेकर पूल) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौस्तुभचे आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. बहिणीला पळवून नेण्याची धमकी त्याने आरोपीला दिली होती. या कारणावरुन आरोपीने कौस्तुभला सोमवारी सायंकाळी दांडेकर पूल परिसरात बोलावून घेतले. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी कौस्तुभला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या कौस्तुभला तातडीने रग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page