लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची संधी; ‘या’ तारखेपर्यंत दिली मुदतवाढ

मुंबई – महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेल्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत दिली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे.

आर्धार-बँक खाते लिंक करणे गरजेचे

Advertisement

लाडकी बहीण योजनेची मुदत 15 ऑक्टोबरनंतर संपणार आहे. या योजनेच्या कोट्यवधी महिला लाभार्थी ठरलेल्या आहेत. काही महिलांना या योजनेचे पैसे बँक खात्यावर मिळत आहेत. पण पात्र ठरूनही अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांशी लिंक असल्यास या योजनेचे पैसे थेट खात्यावर जमा होतात. त्यामुळे ज्या पात्र महिलांना या योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, त्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करणे गरजेचे आहे.

मुदत एकूण चार वेळा वाढवली

लाडकी बहीण योजनेची मुदत एकूण चार वेळा वाढवण्यात आलेली आहे. याआधी शेवटची मुदत ही 30 सप्टेंबर होती. मात्र अनके महिलांचे अर्ज दाखल करणे बाकी असल्यामुळे तसेच जास्तीत जास्त महिलांना या योनजेचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असेल.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page