येत्या निवडणुकीत प्रस्थापितांना धडा शिकवू; छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा

पुणे : काही नेतेमंडळी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा भाजपची बी टीम आहे, असा प्रचार करत आहेत. तसे काही मेसेजेस पण मला आले. पण, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा भाजपची बी टीम नाही अशी स्पष्टोक्ती छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी केली. तसेच येत्या निवडणुकीत समविचारींना सोबत घेऊन प्रस्थापितांना धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Advertisement
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या स्थापना दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, महादेव देवस्कर आदी उपस्थित होते.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039
Advertisement




