गुन्हेगारांना सूट! पुणे शहरातील तब्बल एक हजारापेक्षा जास्त CCTV बंद

पुणे : शहरातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती मिळत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिकेने पुण्यात 2 हजार 909 सीसीटीव्ही बसविले मात्र, यातील 1 हजार 54 सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती मिळत आहे. ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना हे सीसीटीव्ही बंद आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने लावण्यात आलेल्या 2 हजार 909 सीसीटीव्ही पैकी 1 हजार 855 सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
गणेशाेत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशाेत्सवात माेबाईल, साेनसाखळी चाेरी, पाकीट चाेरीचे गुन्हे वाढतात. या पार्श्वभूमीवर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. परंतु त्याची देखभाल दुरुस्ती काेणी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या प्रशासनाच्या दाव्यानुसार आम्ही सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत, त्याचे नियंत्रण पाेलिसांकडे आहे. त्यामुळे त्यांनीच त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




