प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीची ऐशीतैशी; पुण्यात दुकानदारांकडून सर्रास विक्री सुरुचं

पुणे : प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला बंदी असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पिशव्या फेकल्या जात आहेत. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याची अनेकांची तक्रार आहे. पुणे शहर नाहीतर संपूर्ण देशांमध्ये प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे. दुकानदारांकडून पिशव्यांची विक्री सुरुच असल्याचं दिसून येत आहे, अशा दुकानावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कित्येक लोक त्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये घरामध्ये राहिलेलं शिळं अन्न टाकून रस्त्यावर फेकून देत असतात. आणि ते अन्न खाण्यासाठी गुरे शेळ्या कुत्रे मांजरे असे नाना प्रकारचे प्राणी ते अन्न प्लास्टिक पिशवी सहित खात असतात. प्लास्टिक पिशवी खाल्ल्यामुळे प्राण्यांच्या पोटामध्ये ते प्लास्टिक पिशवी पचन होत नाही. पचन न झालेला सर्व प्लास्टिक पिशव्या त्या प्राण्यांचे पोटामध्ये मोठा गट्टा तयार होतो त्यामुळे ते प्राणी आजारी पडून मृत्युमुखी होतो. दुसरी आणखीन एक बाब म्हणजे पावसाळ्यामध्ये मुंबई या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडल्यामुळे सर्व नाले ओवर फुल झाले होते. आणि प्रत्येक ठिकाणी पाणी जाण्याच्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या अडकल्यामुळे पाणी जाण्यास जागा नव्हती. त्यामुळे पूर्ण मुंबईत पाणी साचले होते. हेही एक दुसरी बाजू आहे.
या सर्व कारणामुळे प्लास्टिक आपल्या आरोग्यसाठी हानिकारक आहे. म्हणून प्लास्टिक वर बंदी आणण्यात आली आहे. पण पुण्याच्या प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या मिळत आहेत. त्यांना कोणाचाही भीती नाही. ते खुलेआम प्लास्टिक पिशव्या विकत आहेत. पण कारवाईसाठी पुणे महानगरपालिका यांच्याकडे अधिकार आहे. पण महानगरपालिकेच्या अधिकारी वेळेवर हजर होत नसतात. कारण त्यांच्या आणि प्लास्टिक विक्रेत्यांच्यामध्ये फिक्सिंग झालेला असतो असा आरोप होत आहे.
सुखसागर नगर या ठिकाणी अंबिका या नावाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक विक्री होत आहे. आदेश न्यूज नेटवर्कच्या टीमने त्या ठिकाणी प्लास्टिक पिशवी विकत घेऊन महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांना फोन केलेला होता. पण महानगरपालिकेच्या अधिकारी यांनी गणपती विसर्जनाचं निमित्त सांगून पळवाट काढली.
महानगरपालिकेचे अधिकारी असे म्हणाले की, साहेब आता गणपती विसर्जनचे दिवस आहेत. आम्हाला रात्रंदिवस झोप नाही. गणपती विसर्जन संपू दे त्यानंतर आपण कारवाई करूया. म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी काहीतरी पळवाट काढत नसतील ना. अशी मनामध्ये शंका येते. बंदी असलेले प्लास्टिक पिशव्या कुठलेही दुकानमध्ये विक्री करू नये आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यावर कारवाई करताना पहिला वेळ कारवाई केली तर 5000 रुपये दंड करण्यात येईल. दुसऱ्यांदा कारवाई झाली तर 10000 रुपये दंड आकारण्यात येईल. तिसऱ्यांदा कारवाई झाली तर 25000 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पण अशी कारवाई होताना दिसत नाही आता तरी महानगरपालिका जागी होईल का ? आणि कारवाई करेल का ?वाट पाहावे लागेल.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




