हातभट्टी गाळण करुन गावठी दारु तयार करण्या-या ठिकाणांचा केला नाश..!

मा. पोलिस आयुक्त, पुणे शहर यांनी अवैध हातभट्टी दारु धंदयावर प्रभावीपणे कार्यवाही करणेबाबत सुचना दिल्या आहेत.

सदर सुचनेचे अनुषंगाने पोलिस अंमलदार गद्दे व चव्हाण यांना त्याचे गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, स.नं. १४ नाईकनगर येरवडा पुणे येथे राहणारे काही इसम यांनी स्वतःचे फायदयाकरीता गावठी दारु तयार करणा-यासाठी लागणारे कच्चे रसायन व गावठी तयार दारु साठवण करुन ठेवली आहे. सदरची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक सावंत, सहा. पोलीस निरीक्षक नंदनवार व पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन सदर माहितीच्या अनुषंगाने शोध घेतला असता ३ ठिकाणी मोकळ्या जागेत वरील माहीती प्रमाणे गावठी दारु व कच्चे रसायन मिळुन आले. त्यानंतर वरीष्ठांचे परवानगी घेवुन सदर ठिकाणी मिळुन आलेला अंदाजे १००० लिटर कच्चे रसायन व सामुग्री हे जागीच नाश करण्यात आले व सदर परीसरात १० ते १५ हातभट्टीचा शोध घेवुन ते तोडुन नष्ट करण्यात आले आहेत.

Advertisement

सदर कामगिरी ही मा. अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त-परीमंडळ ०४, पुणे शहर श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्री. सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन श्री. रविंद्र कदम यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक सावंत, सहा. पोलीस निरीक्षक नंदनवार, पोलीस अंमलदार कांबळे, गडमवाड, अहिवळे, निलख, गायकवाड, बेलके, चुकेवाड, ससाने, होळकर व टोपे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page