पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेल्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले

पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागात दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. चोरट्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता मॉर्निंग वॉकसाठी घरा बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील ४१ हजारांचे सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीस्वार चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला २२ सप्टेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी विमानतळ रस्ता विश्रांतवाडी येथून सकळी साडे सातच्या सुमारास जात होत्या. तेव्हा पाठिमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्याजवळ येत गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. उपनिरीक्षक पदमराज अधिक तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




