लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत किती अर्ज आले?, आदिती तटकरे म्हणाल्या…

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दरमहिन्याला दीड हजार रूपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही कागदपत्रांची पुर्तता करणेही आवश्यक आहे. विशेष म्हणजे या योजनेत काही बदल देखील करण्यात आली आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत ७२ लाखांपेक्षा जास्त अर्ज करण्यात आल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेसाठी रोज ८ ते १० लाख अर्ज येत असून, आत्तापर्यंत ७२ लाखांपेक्षा जास्त अर्जांची नोंदणी झाली आहे, असे सांगत अदिती तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, विरोधक पहिला दिवसांपासूनच या योजनेसंदर्भात टीका करत आहेत. मात्र मला आवर्जून सांगायचे आहे की, या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत आहे. आमच्यासाठी ही गोष्ट समाधानकारक आहे. जे टीका करत आहेत.ते त्यांच्या मतदार संघात त्यांचे बॅनर लावून कॅम्प आयोजित करत आहेत.
त्यामुळे महायुती सरकारने आणलेली ही योजना माता भगिनींसाठी किती उपयुक्त आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींना माहिती आहे. त्यामुळे एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला कॅम्प आयोजित करायचे. आणि वेगळे बॅनर लावून दिशाभूल करायची. अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




