मतदानाच्या दिवशी पुणे शहरात कडक बंदोबस्त, हजारो पोलिस असणार तैनात

पुणे – वाहन रॅलीच्या माध्यमातून संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढत शहरातील आठही उमेदवारांनी प्रचाराची सांगता केली. तसेच पत्रकार परीषदेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जागा जास्त निवडुन येतील असा दावा केला आहे. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जाेरदार प्रचार केला गेला. महाविकास आघाडी, महायुती यांच्यातच प्रमुख मतदारसंघात लढत हाेणार आहे. तर काही ठिकाणी मनसेमुळे लढत तिरंगी हाेण्याची चिन्हे आहेत. अशातचं आता विधानसभेच्या मतदानादिवशी (२० नोव्हेंबर) शहरात पुणे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
मतदान केंद्र व शहराचा गेली दोन दिवस आढावा घेऊन हा बंदोबस्त आखला गेला आहे. बंदोबस्तासाठी ११ पोलीस उपायुक्त, २२ सहायक आयुक्ता, ६४ पोलीस निरीक्षक, ३११ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह ५ हजार २५५ पोलीस कर्मचारी आणि १८७० होमगार्ड तैनात असणार आहेत. यासोबतच बाँम्ब शोधक नाशक पथक, शीघ्र कृती दल आणि क्रेंदीय निमलष्करी सशस्त्र दल कार्यरत असणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त आखला गेला आहे. आचार संहिता लागल्यापासून पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास सुरवात केली होती. मतदानाच्या अनुषंगाने बंदोबस्ताची तयारी सुरु केली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




