वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या स्कूल व्हॅनची तोडफोड; तब्बल ‘इतक्या’ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : बदलापूर येथील एका शाळेतील दोन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना पुण्यातील वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील ६ वर्षांच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ४५ वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात असलेली आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्कूल व्हॅन दगडाने फोडली.

स्कूल व्हॅनची तोडफोड केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्या स्कूल व्हॅनमध्येच लहान मुलीवर अत्याचार झाला. आम्हाला देखील लहान मुलं आहेत. आज लहान मुली, महिला सुरक्षित नाही. सरकारनं हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना सर्वात मोठी शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. व्हॅन फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement

गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह नऊजणांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गाडीची तोडफोड केली होती. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार अध्यक्ष विशाल कसबे, धर्मराज यादव लांडगे, मिलिंद हरिदास सरवदे, विशाल वंजारी, सचिन भडकवाड यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यातील हवालदार जोतिबा कुरळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page