बहुजन शक्ती सेनाचे अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड येथे बहुजन शक्ती सेनाचे अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांची जुन्या वादातून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.

बाळासाहेब रणदिवे (वय २८, रा. आंबेडकरनगर) हे बहुजन शक्ती सेनाचे अध्यक्ष असून ते बुधवारी रात्री ९ च्या सुमारास मार्केटयार्ड परिसरात थांबले होते. यावेळी चार आरोपी हे त्यांच्याजवळ आले. यावेळी आरोपी यांनी रणदिवे यांच्याशी जुन्या वादातून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या वादाचे परिमाण भांडणात झाले. आरोपींनी कोयत्याने रणदिवे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात रणदिवे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ससुन रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, आज गुरुवारी सकाळी उपचार सुरू असतांना बाळासाहेब रणदिवे यांचा मृत्यू झाला. रणदिवे यांच्यावर हल्ला झाल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात पंचनामा केला. पोलिसांनी हल्लेखोर आरोपींना अटक केली.

Advertisement

बाळासाहेब रणदिवे हे बहुजन शक्ती सेनाचे अध्यक्ष होते. त्यांचा सामाजिक कार्यात देखील सहभाग होता. काही दिवसांपूर्वी काही कारणावरून आरोपींशी त्यांचा वाद झाला होता. यावेळी त्यांची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. याच वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page