गांजाविक्री करणा-या एकाच कुटुंबातील तीन महिलांना विमानतळ पोलीसांनी केले गजाआड..!

दि.२५/०९/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक, नितीन राठोड यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खुळेवाडी चंदननगर, पुणे येथे काही महिला गांजा विक्री करीत आहेत. त्याअनषंगाने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांना कळविली असता त्यांनी शहानिशा करुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणेतपास पथकातील स्टाफसह सापळा रचुन १) सोनाबाई अंकुश पवार वय ५० वर्ष रा. लक्ष्मीमाता मंदीराजवळ खुळेवाडी पुणे २) सुवर्णा अशोक पवार वय २५ वर्ष रा. लक्ष्मीमाता मंदीराजवळ खुळेवाडी पुणे ३) शालन कांतीलाल जाधव ४५ वर्ष रा. लक्ष्मीमाता मंदीराजवळ खुळेवाडी पुणे या तीन महिलांना गांजा विक्री करीत असताना ताब्यात घेण्यात आलेले आहे. नमुद महिला यांचेकडुन तीस हजार रुपये किं. चा १५६० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे.

Advertisement

सदर महिलांचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.क्र ४७४/२०२५ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चेतन भोसले हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि-०४ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार सना शेख, लालु क-हे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, सचिन मांजरे, दादासाहेब बर्डे यांचे पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page