बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग! प्रशांत किशोर यांचा नवीन पक्ष तयार

पटना : बिहरामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. जन सूरज ही मोहीम आता पक्ष म्हणून राजकीय मैदानामध्ये उतरली आहे. प्रशांत किशोर यांनी जन सूरज मोहिम सुरु करत बिहारमधील हजारो लोकांच्या भेटी घेतल्या. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशांत किशोर यांनी त्यांचा नवीन पक्ष लॉन्च केला आहे. राजकीय रणनीतीकार-कार्यकर्ते म्हणून बिहारमध्ये लोकप्रिय नेते प्रशांत किशोर यांनी पटना येथे लाखो समर्थकांच्या उपस्थितीत राजकीय पक्ष सुरु केला. त्यांच्या पक्षाचे नाव देखील जन सूरज पार्टी असेच आहे.
यावेळी प्रशांत किशोर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी बिहारमधील विकासांचे त्यांचे प्लॅनिंग आणि पक्षाचा विचार मांडला. प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पार्टीमध्ये भेदभावाला अजिबात थारा नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारमध्ये आमचा पक्ष स्थापन झाला आहे. आम्हाला कोणतेही पद नको, असे आम्ही आधीच स्पष्ट केले होते. आमच्या पक्षाचे कार्यवाह प्रदेशाध्यक्ष मनोज भारती हे असतील. ते एका दलित समाजातून आले आहेत. आम्ही त्यांना दलित म्हणून अध्यक्ष बनवले असे नाही तर ते सक्षम आहेत म्हणून ते अध्यक्ष बनले आहेत. ‘जन सुरज’मध्ये जातीच्या आधारावर पद मिळत नाहीत, आणि मिळणार नाहीत. एखाद्याच्या अनुभवाच्या आणि क्षमतेवर व्यक्तीला पद मिळेल. असेही ते म्हणाले.
मधुबनीचे रहिवासी असलेले मनोज भारती जन सूरज फाउंडेशनच्या अधिवेशनात पक्षाचे कार्यवाह अध्यक्ष झाले. नेतरहाट, आयआयटी कानपूर येथून शिक्षण घेतले आणि आयआयटी दिल्लीतून एमटेक केले. प्रशांत किशोर म्हणाले की, ही तर सुरुवात आहे, बघू कसे चेहरे पुढे आणले जातात, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




