रिक्षाचालकाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील महिला आणि तरूणींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूरमधील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अनेक अशाच प्रकारच्या घटना समोर येत आहे. आई-बहिणींवर हात टाकणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाक अजिबात राहिलेला नाही. अशातच अंबरनाथ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची झाल्याची घटना घडली आहे. आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथमध्ये राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना रिक्षाचालकाने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं. मुलगी रिक्षात बसताच त्यानं तिला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर नेलं आणि तिथं तिच्यावर अत्याचार केला. या धककादायक घटनेबाबत मुलीने पोलिसांना माहिती देताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी तताडीनं कारवाई करत त्या रिक्षा चालकालाही बेड्या ठोकल्या. सध्या या नराधमाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. दरम्यान पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचाराच्या या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




