लक्ष्मण हाकेंनी खरंच दारू घेतली होती का? मेडिकल रिपोर्ट आला समोर

पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये पुण्यामध्ये वाद- विवाद झाल्याचे दिसून आले. कोंढवा परिसरामध्ये हा प्रकार घडला असून सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. लक्ष्मण हाके यांनी दारु पिले असल्याचा आरोप मराठा समाजातील तरुणांनी केला. या प्रकरणावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. यानंतर पुण्यातील ससून सर्वौपचार रुग्णालयामध्ये त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. आता मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे.
प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यप्राशन केलं नव्हतं, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
ससून रुग्णालयाकडून लक्ष्मण हाके यांना क्लीनचिट मिळाली. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आता लक्ष्मण हाके हे नागपुरला एका कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




